1 2 3
२७ वर्षातील सर्व ३२४ अंक उपलब्ध !        चालू महिन्यातील अंकाची झलक       

कुमारांसाठी कृतिशीलता जोपासणारे मासिक .

छात्र प्रबोधन

महाराष्ट्रभरातील कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक सुरु करावे, ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉ. आप्पा पेंडसे यांचे स्वप्न होते. केवळ मनोरंजन व माहिती पुरवणे हा या मासिकाचा हेतू नसून त्यातून व्यक्तिमत्त्व विकसनाच्या प्रेरणेचे स्त्रोत निर्माण व्हावे अशी त्यांची कल्पना होती. २०१७ पर्यंत २५ वर्षांचा यशस्वी प्रवास करत छात्र प्रबोधनच्या रुपात हे स्वप्न सत्यात आले.

उद्दिष्ट

कुमारांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी विद्यार्थी, अध्यापक व पालक यांना उपयुक्त ठरणारे मासिक आणि पुस्तके प्रकाशित करणे.

मासिक

कुमारांसाठीचे मासिक- सध्याची सभासद संख्या सुमारे २०००, विस्तार- महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यातील ३६ जिल्हे आणि ३५६ तालुके येथील वर्गणीदार.

उपक्रम

छात्र प्रबोधनच्या विविध उपक्रम केंद्राद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन. उदा. विविध स्थळांना भेटी, जीवनातील वास्तवाचा परिचय करून देणारे अनुभव, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम.

प्रकाशने

खास कुमारांसाठी छात्र प्रबोधन मधील निवडक साहित्यावर आधारित पुस्तके.

ताज्या घटना

jpprakashane.org

अधिक वाचण्यासाठी...

विशेष वार्ता...
नवी संधी!!

अधिक वाचण्यासाठी...


पुरस्कार व सन्मानचिन्हे

उल्लेखनीय घटना

०७

०१/२०१७
राज्यस्तरीय भव्य कुमार साहित्य संमेलन

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय भव्य कुमार साहित्यसंमेलनाचे आयोजन. दि. ७ व ८ जाने. रोजी आयोजित या संमेलनात महाराष्ट्र भरातील समाजाच्या विविध स्तरातील सुमारे १९०० विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग. २५ विषयांवरच्या कार्यशाळा, ११ व्यक्तींच्या प्रेरणादायी मुलाखती, मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी साहित्यकट्टा सुमारे ५० लेखकांशी थेट भेट व गप्पा.

२०

०४/२०१२
सृजनाला पंख नवे

सृजनाला पंख नवे' या स्पर्धात्मक सादरीकरणासाठी मुले छात्र प्रबोधनच्या मासिकातील अंकांचा चांगला उपयोग करतात.

०५

०२/२००५
कुमार महोत्सव

तपपूर्ती' निमित्त 'कुमार महोत्सव' महाराष्ट्रभरातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांची उपस्थिती साहित्य- कला क्षेत्रांशी संबधित विविध कार्यशाळांचे आयोजन, सुमारे ७५ मान्यवर व्यक्तींचा विद्यार्थांशी थेट संवाद. छात्र प्रबोधन मधील निवडक साहित्यावर आधारित सृजनाला पंख नवे' हि अभिनव स्पर्धा

Copyright © 2022 Chhatra Prabodhan. All rights reserved. Layout by W3layouts

web counter