1 2 3
२७ वर्षातील सर्व ३२४ अंक उपलब्ध !        चालू महिन्यातील अंकाची झलक       

२०१६ मध्ये घेतलेले उपक्रम


१. संयोजक प्रशिक्षण शिबिर - ज्यांना मुलांच्या विकासासाठी योगदान दयायचे आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत विविध विषयांवर मुलांना उपयोगी असे उपक्रम घेतले जातात.
२. कार्यानुभव - छात्र प्रबोधन अंकाप्रमाणे नाविन्यपूर्ण मासिकाचे प्रकाशन करणे हे तितकेसे सोपे काम नाही. हे संघटित काम आहे. आपले काम करत करत एकमेकांना सहाय्य करूनच हे संघटित काम शक्य होते. या मासिकात विद्यार्थी स्वतः त्या कार्यात सहभागी होऊन स्वतःला समृद्ध करतात.
३. हस्तलिखित- हस्ताक्षर स्पर्धा आयोजन. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केल्या जातात.
४. अभिवाचन स्पर्धा - छात्र प्रबोधन मधील अंकातून अभिवाचन व कविता सादरीकरण स्पर्धा .
५. साहित्य मेळावा - कुमारांना समृद्ध साहित्य वाचनासाठी उदुक्ता करणे हाच साहित्य मेळावा घेण्यामागे मुख्य उद्देश आहे. या संमेलनाद्वारे त्यांच्या वाचन, सादरीकरण यामध्ये वृद्धी होते.

२०१७ मध्ये घेतलेले उपक्रम

१. कुमार साहित्य संमेलन -
छात्र प्रबोधनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निगडी, पुणे दि. ७,८ जाने. २०१७ रोजी भव्य असे कुमार साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. महाराष्ट्रातून एकूण जवळपास १९०० मुले व मुली या संमेलनात सहभागी झाले होते. यामध्ये लेखक गप्पा, साहित्यिकांबरोबर चर्चा व त्यांचे अनुभव, गोष्टी, साहित्यावर आधारित लेखन, स्पर्धा इ. गोष्टी संमेलनात आयोजित केल्या होत्या.


२. बालकुमार संपादक मेळावा - छात्र प्रबोधनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि. ८ जुलै २०१७ रोजी बालकुमार साहित्य संपादक मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये बालकुमार वयोगटासाठी साहित्य प्रकाशित करणारे प्रकाशक, नियतकालिक चालवणारे संपादक तसेच वृत्तपत्रांमधून या वयोगटासाठी पुरवणी प्रसिद्ध करणारे संपादक अशा २८ जणांचा समावेश होता. एकूण ९ मासिके, ३ वृत्तपत्रे व ५ प्रकाशन संस्थांचे संपादक, कार्यकारी संपादक, व्यवस्थापक व प्रमुख यावेळी उपस्थित होते.
सविस्तर वृत्तासाठी...        छायाचित्रांकरीता...

३. केंद्रप्रमुख मेळावा - छात्र प्रबोधनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दि. ३० जुलै २०१७ रोजी केंद्रप्रमुख मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या केंद्रांचे प्रमुख व काही केंद्रांचे सहकारी उपस्थित होते. चंद्रपूर, वरोरा, अकोला, चाळीसगाव, दौंडाइचा ,साक्री, धुळे, उस्मानाबाद, कोपरगाव, बत्तीस शिराळा , सांगली, सातारा, खंडाळा, खोपोली, रसायनी, अलिबाग, चिपळूण, रत्नागिरी, ठाणे, बोरीवली, डोंबिवली, पंढरपूर, जेऊर, इंदापूर, सासवड, शिवापूर, बारामती, चिखली इ. गावांमधून ४८ सदस्य या मेळाव्यात सहभागी झाले होते.
सविस्तर वृत्तासाठी...       छायाचित्रांकरीता...

४. छात्र प्रबोधन रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा - ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या ‘छात्र प्रबोधन’ या खास कुमार वयोगटासाठी प्रकाशित होणाऱ्या मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दि. ३० जुलै रोजी फडके हॉल येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्यामध्ये ‘वर्ग ग्रंथालय योजना’ व ‘वाचक शिष्यवृत्ती योजना’ या दोन योजनांचा प्रारंभ पुण्याच्या महापौर मा.मुक्ता टिळक व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड व अभिरुची निर्माण व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ‘ वर्ग ग्रंथालय योजना’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. इयत्ता ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असून नाममात्र असे १० रुपये शुल्क भरून ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. वर्गणी भरल्यानंतर विद्यार्थ्यांना छात्र प्रबोधनचे किमान ५० ते ६० अंक वर्षभर वाचायला दिले जातील, तसेच वर्गातील सभासद संख्येपेक्षा १० जादा अंक देण्यात येतील. दर आठवड्याला एक विशिष्ट वार व वेळ ठरवून वर्गामध्ये अंकांची अदलाबदल केली जाईन. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देण्याचा छात्र प्रबोधनचा उद्देश आहे. अनेक शाळांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला असून पुण्यामध्ये एकूण २७ वर्ग ग्रंथालये सुरु झाली आहेत. अशाप्रकारे ५०० वर्ग ग्रंथालये सुरु करण्याचा संकल्प छात्र प्रबोधनचे संपादक श्री. महेंद्र सेठिया यांनी व्यक्त केला.
सविस्तर वृत्तासाठी...       छायाचित्रांकरीता...

Copyright © 2022 Chhatra Prabodhan. All rights reserved. Layout by W3layouts