कुमारांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी विद्यार्थी, अध्यापक व पालक यांना उपयुक्त ठरणारे मासिक आणि पुस्तके प्रकाशित करणे.
ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोगाच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात आणि देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून त्यासाठी विस्तार केंद्रे विकसित करणे.
कुमारांच्या व्यक्तिमत्व विकसनाची चळवळ प्रारंभी महाराष्ट्रात नंतर हळूहळू देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणे.
स्वतःचे व्यक्तिमत्व विकसन, सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालून देशासाठी विधायक काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचे जाळे उभारणे.